एक मोठी बातमी समोर येत आहे. केनियातील एका मुलींच्या वसतीगृहाला आग लागली आहे. या आगीमध्ये अनेक मुलींचा होरपळून मृत्यू झाला आहे. केनियातील नाकुरु काउंटीमधील गिलगिल येथे असलेल्या 'उतुमिषी गर्ल्स ॲकॅडमी'च्या वसतिगृहात काल रात्री उशिरा आग लागली. या आगीत आतापर्यंत 16 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून, अन्य 79 विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
केनियातील गिलगिल येथे असलेल्या 'उतुमिषी गर्ल्स स्कूल'च्या वसतिगृहात काल रात्री अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
शिक्षणमंत्री ज्युलियस ओगाम्बा यांनी सांगितले की, आणखी 79 जण जखमी झाले आहेत. गिलगिल भागात असलेल्या 'उतुमिषी गर्ल्स स्कूल' (Utumishi Girls School) नावाच्या निवासी शाळेच्या वसतिगृहांमध्ये ही आग भडकली. या शाळेत 800 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात.
केनिया रेड क्रॉसच्या माहितीनुसार, आगीची खबर मिळताच आपत्कालीन सेवा आणि रुग्णवाहिका पथके घटनास्थळी तात्काळ दाखल झाली आणि त्यांनी त्वरित मदतकार्य सुरू केले. घटनास्थळी पोहोचलेले एक प्रशासकीय पथक सध्या आगीच्या कारणांचा तपास करत आहे.