केस कापून शिक्षकाने 25 विद्यार्थ्यांना केले विद्रुप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   शिक्षा म्हणून पीटीच्या शिक्षकांनीच विद्यार्थ्यांचे केस कापून त्यांना विद्रुप केले. ही धक्कादायक घटना घडलीय मुंबईत विक्रोळीच्या कमलताई वायकर शाळेत.   हीरोगिरी करतो का असं विचारत शाळेतल्याच शिक्षकानं 25 विद्यार्थ्यांचे केस कापले. केस कापून या विद्यार्थ्यांना विद्रुप केले.    याप्रकरणी पीटी शिक्षक आणि एका शिपायाला अटक करण्यात आली. शाळेच्या संचालकाच्या मुलाच्या […]

केस कापून शिक्षकाने 25 विद्यार्थ्यांना केले विद्रुप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिक्षा म्हणून पीटीच्या शिक्षकांनीच विद्यार्थ्यांचे केस कापून त्यांना विद्रुप केले. ही धक्कादायक घटना घडलीय मुंबईत विक्रोळीच्या कमलताई वायकर शाळेत.

 

हीरोगिरी करतो का असं विचारत शाळेतल्याच शिक्षकानं 25 विद्यार्थ्यांचे केस कापले. केस कापून या विद्यार्थ्यांना विद्रुप केले. 

 

याप्रकरणी पीटी शिक्षक आणि एका शिपायाला अटक करण्यात आली. शाळेच्या संचालकाच्या मुलाच्या आदेशावरुन हे कृत्य केल्याचं पीटीच्या शिक्षकानं म्हटले.

 

वायकर शाळेत नऊशे विद्यार्थी शिक्षण घेतात. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नेहमीप्रमाणे वर्ग भरले. पण पहिल्याच तासाला पीटीचे शिक्षक मिलिंद झणके यांनी पाचवी ते

नववीपर्यंतच्या वर्गात केस वाढवलेल्या मुलांना वर्गाबाहेर काढलं. पीटीच्या शिक्षकांनी मग वर्गाबाहेरच बाकडं टाकलं.

 

शिपाई तुषार गोरेला हाताशी घेऊन त्यांनी जबरदस्तीनं विद्यार्थ्यांचे केस कापून त्यांना विद्रुप केले. सर सोडा अशी विनंती करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करुन त्यांचे केस

कापण्यात आले. काही विद्यार्थ्यांना यात कैचीही लागली.

 

घरी आल्यावर पालकांना हे दृश्य दिसलं तेव्हा त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. शाळा संचालकाचा मुलगा गणेश बट्टा, पीटी शिक्षक मिलिंद झाणके आणि शिपाई

तुषार गोरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number