स्कुलबस चालकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात घडली आहे. बलात्कारानंतर बदनामीच्या भीतीने मुलीने विषप्राशन करून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
औसा येथील एका शाळेतून या 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला 29 ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे स्कुलबस मधून शाळेतून घरी सोडण्यात येत होते. त्यावेळी इतर सर्व विद्यार्थ्यांना सोडल्यानंतर गाडीतील गॅस संपल्याचा बहाणा करून स्कुलबसच्या चालकाने मुलीला एका शेतात नेलं. तेथे तिच्यावर अत्याचार केल्यावर आरोपी पळून गेले.
या घटनेनंतर बदनामीच्या भीतीने पीडित मुलीने तणनाशक औषध पिऊन आत्महत्येचा प्रयास केला. तिच्यावर लातूरच्या खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. मात्र उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. याबाबत शेतमजुरी करणाऱ्या तिच्या वडिलांच्या पोलिसांकडे फिर्याद दाखल केली.
पोलिसांनी यातील स्कुलबस चालक शंकर स्वामी त्यास मदत करणारा सूरज ठाकूर यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस आता पुढील तपास करत आहेत.