शाळेसाठी कर्ज काढले, सोन्याची अंगठी विकली

जय महाराष्ट्र न्यूज, बीड   धंदेवाईक दृष्टीकोन बाळगून काम करणारे आसपास दिसत असताना ऊतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये, हे तत्त्व अंगिकारणारेही आहेच. याची प्रचिती दिलीय, बीडच्या एका शिक्षकानं. त्यानं आपल्या शाळेची दुरुस्ती करण्याबरोबरच ई-लर्निंग शाळा बनविण्यासाठी आपल्या प्रॉव्हिडंट फंडातून कर्ज काढलं. पण तेही कमी पडल्यानं सोन्याची अंगठी मोडली. लाकूडतोड्याचा प्रामाणिकपणा पाहून देवीनं […]

शाळेसाठी कर्ज काढले, सोन्याची अंगठी विकली

जय महाराष्ट्र न्यूज, बीड

 

धंदेवाईक दृष्टीकोन बाळगून काम करणारे आसपास दिसत असताना ऊतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये, हे तत्त्व अंगिकारणारेही आहेच. याची प्रचिती दिलीय, बीडच्या एका शिक्षकानं. त्यानं आपल्या शाळेची दुरुस्ती करण्याबरोबरच ई-लर्निंग शाळा बनविण्यासाठी आपल्या प्रॉव्हिडंट फंडातून कर्ज काढलं. पण तेही कमी पडल्यानं सोन्याची अंगठी मोडली.

लाकूडतोड्याचा प्रामाणिकपणा पाहून देवीनं प्रसन्न होऊन त्याला सोन्या-चांदीची कुऱ्हाड भेट दिल्याची गोष्ट तर सर्वांनाच माहितीय. रवींद्र गायकवडांबाबतही तसंच घडलंय. देवी सरस्वतीचे उपासक रवींद्र गायकवाडांच्या या तळमळीची दखल घेऊन सारस्वतांच्या मांदियाळीत त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

39व्या मराठवाडा साहित्यसंमेलनात बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी गायवाड यांना सोन्याच्या दोन अंगठ्या भेट दिल्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number