Maharashtra Budget 2025: अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा

कधी अवकाळी तर दुष्काळ अशा अनेक समस्यांनी महाराष्ट्रात शेतकरी अनेक गोष्टींनी त्रस्त असतात. परंतु आता अर्थसंकल्प सादर होत असतांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या

Maharashtra Budget 2025: अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा

महाराष्ट्र: कधी अवकाळी तर दुष्काळ अशा अनेक समस्यांनी महाराष्ट्रात शेतकरी अनेक गोष्टींनी त्रस्त असतात. परंतु आता अर्थसंकल्प सादर होत असतांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्यात. यामध्ये एक जिल्हा एक उत्पादन योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. राज्याचे नवीन लॉजीस्टिक धोरण लवकरच तयार करण्यात येणार. तसेच कापूस उत्पादन वाढीवर भर दिला जाणार आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी कृषी क्षेत्रात एआय चा वापर केला जाणार आहे. याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. त्याचबरोबर  शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देण्यात येणार असून शेतकऱ्यांना दिवस वीज पुरवठा करणार आहेत. त्यामुळे ह्या अर्थसंकल्पात शेकतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्यात. याचा मोठा फायदा देखील शेतकऱ्यांना होणार आहे. 

हेही वाचा: Maharashtra Budget 2025: मुंबईत तिसरं विमानतळ; अजित पवारांची मोठी घोषणा 

कृषी क्षेत्रात एआयचा वापर कसा? 

कृषी क्षेत्रामध्ये AI ची ओळख करून दिल्याने किफायतशीरपणा आणि कमी श्रमाच्या दृष्टीने नफा मिळविण्यात मदत होऊ शकते. AI द्वारे व्युत्पन्न केलेले भविष्यसूचक विश्लेषण शेतकऱ्यांना पीक उत्पादनाची उत्तम रणनीती, खतांचा कार्यक्षम वापर आणि मातीच्या आरोग्याचे निरीक्षण यासारख्या सूचना देऊ शकतात.

शेतकऱ्यांना दिवसभर वीज पुरवठ्याचा फायदा?  
शेतकऱ्यांना दिवसभर वीज पुरवठा मिळाल्यास, त्यांना कृषी कार्यांसाठी अखंड वीज मिळते आणि त्यांचे पीक वाचवता येते. त्यामुळे त्यांचे उत्पादन वाढते आणि त्यांना आर्थिक फायदा होतो. 

दिवसभर वीज पुरवठ्याचे फायदे:
शेतकरी दिवसभर काबाडकष्ट करत असतो, त्यामुळे त्याला पिकांना पाणी पाजण्यासाठी रात्री जायला सांगणे, हे मानवी हक्काचे उल्लंघन आहे. 
रात्री अपरात्री जंगली श्‍वापदांचा हल्ला होण्याची तसेच सर्पदंश होण्याची शक्‍यता असते. 
दिवसभर वीज पुरवठा मिळाल्यास, शेतकरी दिवसातच कृषी कार्यांसाठी वीज वापरू शकतात आणि त्यांचे पीक वाचवू शकतात. 
कृषी क्षेत्रात सौर ऊर्जा वापरण्याचे फायदे दीर्घकाळात वीज आणि विजेवर होणारा खर्च वाचतो. 

लॉजीस्टिक धोरण म्हणजे काय? 

लॉजिस्टिक धोरण म्हणजे, वस्तूंचे उत्पादन, साठवणूक, वितरण यासाठीची व्यवस्थापन योजना आणि नियोजन चौकट. लॉजिस्टिक्समध्ये खरेदी, इन्व्हेंटरी व्यवस्थापन, वाहतूक, पॅकेजिंग, आणि जोखीम व्यवस्थापन यांचा समावेश होतो. 

लॉजिस्टिक्स धोरणाचे उद्दिष्ट: 
वस्तू योग्य ठिकाणी, योग्य वेळी आणि योग्य स्थितीत पोहोचवणे
खर्च कमी करणे
कार्यक्षमता वाढवणे
ग्राहक सेवा आणि किफायतशीरता यांच्यातील संतुलन साधणे

लॉजिस्टिक्स धोरणाची महत्त्वे: 
लॉजिस्टिक्स व्यवस्थापन हे कोणत्याही व्यवसायासाठी महत्त्वाचे कार्य आहे.
ई-कॉमर्स व्यवसायांसाठी, वेळेवर आणि विश्वासार्ह वितरणासाठी कार्यक्षम लॉजिस्टिक आवश्यक आहे.
संपूर्ण उद्योगांमधील व्यवसायांच्या यशामध्ये लॉजिस्टिक सेवा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
लॉजिस्टिक्स धोरणात माहिती तंत्रज्ञान, ई-गव्हर्नन्स आणि इंटरनेटची मदत होऊ शकते. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number