मुंबई विद्यापीठाच्या स्थगित परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा सोमवारपासून सुरु होणार आहेत. हिवाळी सत्राच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांना संपाचा फटका बसला होता. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारल्यानं परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. 3 आणि 4 फेब्रुवारीच्या स्थगित झालेल्या परीक्षांचं वेळापत्रक लवकरच वेबसाईटवर जाहीर केले जाणार आहे. तर पूर्वी जाहीर झालेल्या परीक्षा आधीच्या वेळापत्रकानुसारच सोमवारपासून पार पडतील, […]

मुंबई विद्यापीठाच्या स्थगित परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा सोमवारपासून सुरु होणार आहेत. हिवाळी सत्राच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांना संपाचा फटका बसला होता. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारल्यानं परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. 3 आणि 4 फेब्रुवारीच्या स्थगित झालेल्या परीक्षांचं वेळापत्रक लवकरच वेबसाईटवर जाहीर केले जाणार आहे. तर पूर्वी जाहीर झालेल्या परीक्षा आधीच्या वेळापत्रकानुसारच सोमवारपासून पार पडतील, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, विद्यापीठाने आवश्यक त्या उपाययोजना करुन परीक्षा वेळेत घ्याव्यात, अशी सूचना उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानेही केल्या आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा सोमवार दिनांक ६ फेब्रुवारीपासून निर्गमित केलेल्या निर्धारित वेळापत्रकानुसार सुरू होणार आहेत. अकृषी विद्यापीठ, महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या परीक्षेच्या कामकाजावरील बहिष्काराच्या आंदोलनामुळे शुक्रवार दिनांक ३ फेब्रुवारीपासून परिक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. mu.ac.in या संकेतस्थळावर राहिलेल्या दोन तारखांच्या (3 आणि 4 फेब्रुवारी) पेपर्सचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number