‘मणिपूरमधील दृश्य दोन्ही सरकारांना लाज वाटायला लावणारं’

मुंबई, २१ जुलै २०२३, प्रतिनिधी : मणिपूरमध्ये महिलांवर केलेल्या अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून सर्वोच्च न्यायालयानेही केंद्र व राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यात दोन्हीही सरकारांना आलेले अपयश पाहता काँग्रेससह विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.मणिपूरमध्येही भाजप सरकार आहे, अमित शहा यांच्या दौऱ्यानंतरही मणिपूर अशांत आहे.त्यातच काल […]

‘मणिपूरमधील दृश्य दोन्ही सरकारांना लाज वाटायला लावणारं’

मुंबई, २१ जुलै २०२३, प्रतिनिधी : मणिपूरमध्ये महिलांवर केलेल्या अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून सर्वोच्च न्यायालयानेही केंद्र व राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यात दोन्हीही सरकारांना आलेले अपयश पाहता काँग्रेससह विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.मणिपूरमध्येही भाजप सरकार आहे, अमित शहा यांच्या दौऱ्यानंतरही मणिपूर अशांत आहे.त्यातच काल एका समुदायाच्या जमावाकडून दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. एका २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिच्या भावाची व वडिलांची हत्या केल्याचा प्रकारही समोर आला आहे. या सर्व परिस्थितीवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे.

राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “कालपासून मणिपूरमधील समाजमाध्यमांवर जी दृश्य समोर आली आहेत ती हादरवणारी आहेत, आणि दोन्ही सरकारांना लाज वाटायला लावणारी आहेत. मी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधानांना आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली होती की आता तरी या विषयात लक्ष घालून मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होईल हे पहा, पण परिस्थिती’जैसे थे’ आहे. आणि हेच दुर्दैव आहे. या प्रकरणातील जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी. पण त्याचवेळेस जर केंद्र सरकारकडून ठोस कृती होणार नसेल तर, आता राष्ट्रपती महोदयांनी ह्यात लक्ष घालायला हवं”, असं राज यांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर मणिपूरमध्ये गेल्या ३ महिन्यात जे घडलं त्याने फक्त मणिपूरच नाही तर संपूर्ण भारताच्या समाजमनावर ओरखडा उमटला आहे आणि ह्यातून काही वर्षांनी एखादं आक्रीत घडलं तर त्याला मात्र सध्याचंच सरकार जबाबदार असेल.पंतप्रधानांनी आत्ता जरी ह्या घटनेचा निषेध केला असला तरी तो पुरेसा नाही, आता कृती करा, अन्यथा ईशान्य भारत कायमचा भारतापासून तुटेल, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number