आत्महत्या करणाऱ्याला वाचवायला गेले आणि…

जय महाराष्ट्र न्यूज, गोवा आत्महत्या करणाऱ्या मुलाला वाचवायला गेले आणि नदीत पडले. गोव्याच्या सावर्डेमध्ये ही दुर्घटना घडली.   पोर्तुगीजकालीन पूल कोसळल्याच्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. आतापर्यंत 35 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तरी युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे. या पूलावरील दुर्घटनेत 50 लोक नदीत पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सावर्डेचा हा पूल जुना असल्यानं […]

आत्महत्या करणाऱ्याला वाचवायला गेले आणि…

जय महाराष्ट्र न्यूज, गोवा

आत्महत्या करणाऱ्या मुलाला वाचवायला गेले आणि नदीत पडले. गोव्याच्या सावर्डेमध्ये ही दुर्घटना घडली.

 

पोर्तुगीजकालीन पूल कोसळल्याच्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. आतापर्यंत 35 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तरी युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे.

या पूलावरील दुर्घटनेत 50 लोक नदीत पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सावर्डेचा हा पूल जुना असल्यानं दुर्घटना टाळण्यासाठी तो बंद ठेवण्यात आला होता.

 

पण गुरुवारी एक युवक आत्महत्येचा प्रयत्न करत असताना त्याला वाचवण्यासाठी काहीजण त्या पुलावर गेले. अचानक आलेल्या जमावाच्यां वजनानं पूल कोसळल्याने ही दुर्घटना घडल्याचं बोललं जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number