डार्विनचा मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत पूर्णपणे चुकीचा; केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांचं धक्कादायक वक्तव्य

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   डार्विन मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत पूर्णपणे चुकीचा असल्याचं धक्कादायक वक्यव्य केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिहं यांनी केलंय. हे वक्तव्य करत सत्यपाल सिंह यांनी चक्क विज्ञानालाच आव्हान दिलंय. वेदांचा अभ्यास करताना पुराणांमध्ये कुठंही माकडापासून मनुष्याची निर्मिती झालीय असा उल्लेख नसल्याचंही सत्यापाल सिंह म्हणालेत. त्यामुळे डार्विनचा सिद्धांत पूर्णपणे चुकीचा असून तो […]

डार्विनचा मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत पूर्णपणे चुकीचा; केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांचं धक्कादायक वक्तव्य

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

डार्विन मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत पूर्णपणे चुकीचा असल्याचं धक्कादायक वक्यव्य केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिहं यांनी केलंय. हे वक्तव्य करत सत्यपाल सिंह यांनी चक्क विज्ञानालाच आव्हान दिलंय.

वेदांचा अभ्यास करताना पुराणांमध्ये कुठंही माकडापासून मनुष्याची निर्मिती झालीय असा उल्लेख नसल्याचंही सत्यापाल सिंह म्हणालेत. त्यामुळे डार्विनचा सिद्धांत पूर्णपणे चुकीचा असून तो चुकीचा असल्याचं सत्यपाल सिंह म्हणालेत.

यावेळी त्यांनी जीवन जगण्यासाठी वेद महत्त्वाचे असून संस्कृती जोपासना करायची असेल तर सर्व धर्मियांनी वेदाला जपावं असं आवाहन डॉ. सत्यपाल सिंह यांनी केलंय औरंगाबादच्या वैदिक संमेलनात ते बोलत होते.

हा सिद्धांत चार्ल्स डार्विन यांनी 1858 मध्ये मांडला

सर्व सजीव पृथ्वीवर निसर्गनियमाने जन्माला येतात

ज्या सजीव जाती नैसर्गिक बदलांना तोंड देत उत्क्रांत होतात; त्याच जाती काळाच्या ओघात टिकतात. ज्यांना हे जमत नाही त्या प्राणिजाती नष्ट होतात आणि त्यांची जागा नव्या जाती घेतात.

हे बदल घडायला कोट्यवधी वर्षे जावी लागतात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number