‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सत्यजीत तांबे यांच्यावर भाष्य केलं. सत्यजीत तांबे यांचे भवितव्य काँग्रेस मध्येच असल्याचे थोरात म्हणाले. तसेच भविष्यात सत्यजीत काँग्रेसमध्येच येतील असा विश्वासही थोरातांनी व्यक्त केला आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघात डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु, डॉ. सुधीर तांबे यांचा मुलगा सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी मागितली होती. सत्यजीत तांबे हे बाळासाहेब थोरात यांचे भाचे असल्याने त्यांना उमेदवारी मिळेल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज सत्यजीत तांबे नाराज होत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि निवडणुकीत सत्यजीत तांबे यांचा विजय झाला.