सतीश उकेंना ६ एप्रिल पर्यंत ईडी कोठडी

जमिनीच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीच्या ताब्यात असलेले वकील सतीश उके यांना विशेष न्यायालयाने ईडी कोठडी सुनावली आहे. सतीश उके यांच्यासह त्यांचा भाऊ प्रदीप उके यांनाही ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. येत्या ६ एप्रिलपर्यंत सतीश उके आणि प्रदीप उके यांना ईडी कोठडी सुनावली आहे. सतीश उके आणि प्रदीप उके यांच्यावर जमीन गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले होते. […]

सतीश उकेंना ६ एप्रिल पर्यंत ईडी कोठडी

जमिनीच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीच्या ताब्यात असलेले वकील सतीश उके यांना विशेष न्यायालयाने ईडी कोठडी सुनावली आहे. सतीश उके यांच्यासह त्यांचा भाऊ प्रदीप उके यांनाही ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. येत्या ६ एप्रिलपर्यंत सतीश उके आणि प्रदीप उके यांना ईडी कोठडी सुनावली आहे.

सतीश उके आणि प्रदीप उके यांच्यावर जमीन गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले होते. विविध प्रकरणात आरोपीची कोठडी मिळून तपासाची गरज असल्याचा युक्तीवाद ईडीकडून करण्यात आला. न्यायालयाने ईडीचा युक्तीवाद मान्य करत उके भावंडांना ६ एप्रिल पर्यंत ईडी  कोठडी सुनावली आहे.

ईडीने गुरुवारी वकील सतीश उके आणि प्रदीप उके यांना नागपुरात अटक केली होती. नागपूरच्या ईडी कार्यालयात सतीश उके आणि भाऊ प्रदीप उके यांची पाच तास चौकशी झाली. त्यानंतर ईडीचे पथक त्यांना घेऊन मुंबईत आले. उके यांच्या गैरव्यवहार प्रकरणी युक्तिवाद झाला असून विशेष न्यायालयाने त्यांना ६ एप्रिलपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून ईडीची कारवाई होत असल्याचा आरोप वकील सतीश उके यांच्या कुटुंबियांनी केला आहे. सतीश उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. फडणवीसांनी २०१४मधील विधानसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी खटल्यांची माहिती लपवल्याचा आरोप सतीश उके यांनी केला होता. याविरोधात सतीश उके यांनी याचिका दाखल केली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number