जय महाराष्ट्र न्यूज, सातारा
सातारा-कोकण किनारपट्टी भागात आलेल्या ओखी वादळामुळे राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस पडतोय.याचा फटका आंबा, द्राक्ष आणि स्ट्रॉबेरी पिकांनाही बसलाय.
स्ट्रॉबेरी हे महाबळेश्वरमधील प्रमुख पीक आहे. स्ट्राॅबेरीचा हंगाम दरवर्षी नोव्हेंबरमध्ये सुरु होतो.
परतीच्या पावसामुळे यंदाचा स्ट्राॅबेरी हंगाम आधिच एक महिना उशीरानं सुरु झाला. त्यात ओखीच्या पावसामुळे उत्पादकांचं मोठं आर्थिक नुकसान झालय.