Kelghar Ghat Landslide : केळघर घाटात कोसळली दरड, सातारा–महाबळेश्वर मार्गावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा; मार्ग वाहतुकीसाठी बंद

सातारा : महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटातील काळा कडा परिसरात मुसळधार पावसामुळे महाकाय दरड कोसळल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरडीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड-मातीचा ढिगारा साचला असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. घटनास्थळी सह्याद्री ट्रेकर्स मदतकार्य करत असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी जेसीबीची तातडीने आवश्यकता आहे. दरम्यान, दरड हटविण्याच्या प्रयत्नात एक जेसीबीही अडकल्याची […]

Kelghar Ghat Landslide : केळघर घाटात कोसळली दरड, सातारा–महाबळेश्वर मार्गावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा; मार्ग वाहतुकीसाठी बंद

सातारा : महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटातील काळा कडा परिसरात मुसळधार पावसामुळे महाकाय दरड कोसळल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरडीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड-मातीचा ढिगारा साचला असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. घटनास्थळी सह्याद्री ट्रेकर्स मदतकार्य करत असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी जेसीबीची तातडीने आवश्यकता आहे. दरम्यान, दरड हटविण्याच्या प्रयत्नात एक जेसीबीही अडकल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाला तातडीने मदतीचे आवाहन करण्यात आले असून, नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत या मार्गावरून प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचा : Ambergris: अलिबाग पोलिसांची मोठी कारवाई! तब्बल 4 कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त; पहाटेच्या कारवाईत आरोपी जेरबंद

राज्याच्या काही भागात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. तर काही भागात अद्यापही चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे. मुंबईसह कोकण, पुणे सातारा या भागात चांगला पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळं काही भागात वाहतुकीला देखील अडचणी येत आहेत. अशातच सातारा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटातील काळा कडा परिसरात मुसळधार पावसामुळे महाकाय दरड कोसळल्याची घटना घडली. मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number