जय महाराष्ट्र न्यूज, सातारा
स्मशानभूमी ही मानवी आयुष्यातील शेवटची जागा मानली जाते. मात्र, एका अवलियानेहा समज चुकीचा ठरवत आपला वाढदिवस स्मशानभूमीत साजरा करुन सामाजिक कार्याचा श्रीगणेशा केलाय.
शिवसेनेचे खटाव तालुक्याचे अध्यक्ष प्रताप जाधव यांच्या या अनोख्या वाढदिवसाची सर्वत्र चर्चा सध्या सुरू आहे.
प्रताप जाधव यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून त्या पैशातून स्मशानभूमीच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेतले. येत्या काही दिवसात स्मशानभूमीचे चित्र पालटेल असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.