महावितरणचा निष्काळजीपणा, धोकादायक स्थितीत असलेला विजेचा खांब काम सुरू असताना मधोमध तुटला

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा   साताऱ्यात विजेचा खांब कोसळला. त्यात 3 जण जखमी झाले आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.     या विजेच्या खांबावर 3 वायरमन काम करत होते. अचानक हा खांब मधोमध तुटला. आणि रस्त्यावर कोसळला. तिन्ही वायरमन खाली कोसळले.     दरम्यान, या दुर्घटनेआधीच एक वृद्ध महिला आणि पुरुष तिथून गेले. […]

महावितरणचा निष्काळजीपणा, धोकादायक स्थितीत असलेला विजेचा खांब काम सुरू असताना मधोमध तुटला

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

 

साताऱ्यात विजेचा खांब कोसळला. त्यात 3 जण जखमी झाले आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

 

 

या विजेच्या खांबावर 3 वायरमन काम करत होते. अचानक हा खांब मधोमध तुटला. आणि रस्त्यावर कोसळला. तिन्ही वायरमन खाली कोसळले.

 

 

दरम्यान, या दुर्घटनेआधीच एक वृद्ध महिला आणि पुरुष तिथून गेले. ते थोडक्याच बचावले. हा खांब धोकादायक स्थितीतच होता. याबाबत स्थानिकांनी वारंवार महावितरणकडे तक्रार केली होती.

 

 

महावितरणनं तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. मात्र महावितरणचा हा निष्काळजीपणा कुणाच्या तरी जीवावर बेतू शकला असता. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number