जय महाराष्ट्र न्यूज, सातारा
साताऱ्यातील शासकीय रुग्णालयातील प्रिझन वॉर्डमध्ये सुरुची राडा प्रकरणात संशयित आरोपींनी प्रिझन वॉर्डमध्ये डान्स केल्याचे प्रकरण समोर आलंय. हे प्रकरण बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांच्या अंगलट आलंय.
पोलीस कर्मचारी अनिल रजपूत यांना पोलीस अधीक्षक संदीप पाटलांनी निलंबीत केलंय. तर, तीन पोलिसांची चौकशी सुरु केलीय.
दोन दिवसांपूर्वी प्रिझन वॉर्डमध्ये संशयित आरोपींनी बिनधोकपणे मोबाईल वरील गाण्याच्या ठेक्यात डान्स केल्याचे समोर आल्यानंतर या घटनेने साताऱ्यात खळबळ उडाली होती याची.
दरम्यान पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी गंभीर दखल घेत पोलीस कर्मचारी अनिल रजपूत यांना निलंबीत केलंय.