जय महाराष्ट्र न्यूज, सातारा
साताऱ्यात राजपथावर सकाळच्या सुमारास विद्यार्थ्यांची शाळेत अन् नोकरदारांची कामावर जाण्याची लगबग सुरू होती. दुकानदारही दुकाने उघडू पाहत होते. वाहनांची गर्दी हळूहळू वाढत असतानाच भर रस्त्यात दोन वळूंची झुंज सुरू झाली.
अचानक घडलेल्या या प्रकाराने राजपथावर सर्वांचीच पळापळ सुरू झाली. हा थरार पाहण्यासाठी बघ्याची गर्दीही झाली.
अनेकांनी भितीपोटी सुरक्षित ठिकाण गाठले. अखेर मस्तवाल वळूंची झुंज मिटविण्यात सातारकरांना पुढाकार घ्यावा लागला. तब्बल दोन तासांनतर ही झुंज थांबली.