जय महाराष्ट्र न्यूज, बारामती
सासवड-काळदरी रोडवर बस घाटात कोसळून अपघात झालाय. काळदरी घाटात ही बस तब्बल 50 फूट खोल दरीत कोसळली.
यात 15 प्रवासी झाले जखमी झालेत. बस सासवडहून काळदरीकडे जात असतांना हा अपघात घडलाय. चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात झालाय.
अपघातावेळी बसमध्ये 25 प्रवासी होते. जखमींवर सासवड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.