जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मालकी हक्काची घरं असूनही राज्याच्या आजी-माजी अधिकाऱ्यांना सरकारी निवासस्थानाचा मोह टाळता येत नाही असाच एक प्रकार राज्याचे माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याबाबतीत समोर आलं.
राज्याच्या मुख्य सचिव पदावरून सेवानिवृत्त होऊनही स्वाधीन क्षत्रिय यांनी मंत्रालयासमोरचा आलिशान शासकीय बंगल्याचा ताबा सोडलेला नाही. याउलट ते सेवा अधिकाराच्या आयुक्तपदी वर्णी लागल्यानंतर या शासकीय इमारतीत नवीन फ्लॅटची मागणी करत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली.