#MeToo मोहीमेत बिग बींचं नावही समोर येणार?

#MeToo मोहीमेत आतापर्यंत बॉलीवुडच्या अनेक दिग्गज कलाकारांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत, आता बॉलीवुड इंडस्ट्रीचा बादशाह बिग बी अमिताभ यांचं नाव पुढे येत आहे. अर्थात आतापर्यंत कोणीही त्यांच्यावर आरोप केला नसला तरी त्यांनी केलेला अन्यायही लवकरचं समोर येईल असं सूचक टि्वट हेअर स्टायलिस्ट सपना भवनानी हिने केलं आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांनी […]

#MeToo मोहीमेत बिग बींचं नावही समोर येणार?

#MeToo मोहीमेत आतापर्यंत बॉलीवुडच्या अनेक दिग्गज कलाकारांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत, आता बॉलीवुड इंडस्ट्रीचा बादशाह बिग बी अमिताभ यांचं नाव पुढे येत आहे.

अर्थात आतापर्यंत कोणीही त्यांच्यावर आरोप केला नसला तरी त्यांनी केलेला अन्यायही लवकरचं समोर येईल असं सूचक टि्वट हेअर स्टायलिस्ट सपना भवनानी हिने केलं आहे.

आपल्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांनी #MeToo मोहिमेबद्दल आपली भूमिका मांडली होती.

कोणत्याही महिलेशी अशा प्रकारचे वर्तन व्हायला नको, असे ते म्हणाले होते. त्यानंतर भवनानी हिने त्यांच्यावर टिका केली. मी टू बाबत आपली भूमिका मांडणारी पोस्ट अमिताभ यांनी लिहिली

होती. ती शेअर करत भवनानी हिने लिहिलं, ‘हे कदाचित जगातल सर्वात मोठं खोटं असेल. सर, पिंक सिनेमा प्रदर्शित होऊन गेलाय. तुमची कार्यकर्त्याची प्रतिमाही अशीच संपणार आहे. तुमचं सत्यही लवकरच बाहेर येईल.’

भवनानीच्या टि्वटनंतर एकच खळबळ उडाली. भवनानीच्या टि्वटनंतर सर्वांना वाटलं सपना भवनानी हिच शोषणाची बळी आहे. पण त्याबाबतही तिने स्पष्ट केलं की ‘मला अमिताभ यांचा

कोणताही वाईट अनुभव आलेला नाही. पण त्यांच्या गैरवर्तनाच्या अनेक गोष्टी मी स्वत: ऐकल्या आहेत. या महिला पुढे येतील अशी मला आशा आहे.’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number