जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट कशा पद्धतीने लावावी, ही महिला, मुलींसाठी खूप मोठी समस्या आहे. या समस्येवर तोडगा म्हणून नागपुरच्या संवर्धन महिला बचत गटाने एक नावीन्यक्रम उपक्रम सुरू केला आहे.
हा महिला बचत गट, शाळांमध्ये जाऊन, सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट कशा पद्धतीने लावायची, याबाबतचे ट्रेनिंग मुलींना देते. साध्या पेपर पासून पॅकिंग बॉक्स तयार करणे त्याला रेड टॅग देऊन त्याची पुढची प्रक्रिया करणे हे सांगितले जाते. फक्त कर्ज देण्यापुरती ओळख असलेल्या बचत गटा मार्फत महिलांनी, महिलांसाठी राबवलेल्या या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
योग्य विल्हेवाट न लावल्याने हा सॅनिटरी नॅपकिनचा कचरा घातक ठरत आहे. म्हणून सॅनिटरी नॅपकिनची शास्त्रोक्तपद्धतीने विल्हेवाट लावणे व महिला, मुलींमध्ये याबाबत जनजागृती निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संवर्धन महिला बचत गटाच्या उपक्रमामुळे महिलांच्या आरोग्याची काळजी तर घेतली जाते सोबत परिसरातील स्वच्छता ठेवण्यास मदत होत आहे.