संत तुकारामांची गाथा आता इंग्रजीमधून

संत तुकोबांची गाथा आता इंग्रजी भाषेत ही वाचायला मिळणार आहे. याचा प्रथम खंड तयार झाला आहे. भाविकांना तो वाचण्यासाठी उपलब्ध झाला आहे. संत तुकाराम महाराज यांच्या सार्थ अभंग गाथेचा अनुवाद इंग्रजी मध्ये डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी केला आहे. यामुळे इंग्रजी माध्यमात शिकणारी मुले तसेच परदेशातील नागरिक ज्यांना गाथा वाचायची आहे. पण भाषेची अडचण होती […]

संत तुकारामांची गाथा आता इंग्रजीमधून

संत तुकोबांची गाथा आता इंग्रजी भाषेत ही वाचायला मिळणार आहे. याचा प्रथम खंड तयार झाला आहे. भाविकांना तो वाचण्यासाठी उपलब्ध झाला आहे. संत तुकाराम महाराज यांच्या सार्थ अभंग गाथेचा अनुवाद इंग्रजी मध्ये डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी केला आहे. यामुळे इंग्रजी माध्यमात शिकणारी मुले तसेच परदेशातील नागरिक ज्यांना गाथा वाचायची आहे. पण भाषेची अडचण होती त्यांना याचा खूप उपयोग होणार आहे.

इंग्रजी अनुवादित तुकाराम गाथा मध्ये बाल क्रीडा, काल्याचे अभंग अशाचा समावेश पहिल्या खंडात केला आहे. त्यामुळे संत साहित्याचा साठा समुद्रा पारही वाचले जाईल, अभ्यासले जाईल. याबाबत वारकरी संप्रदायात आनंद आहे. तर संत तुकाराम महाराज यांचे विद्यमान वंशज यांनीदेखील समाधान व्यक्त केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number