संकर्षण झाला बस चालक

मुंबई, २ जून २०२३, प्रतिनिधी : अभिनेता – लेखक संकर्षण कऱ्हाडे समाज माध्यमांवर नेहमीच सक्रिय असतो. त्याच्या अभिनयासह कवितांचे देखील अनेक चाहते आहेत. अशातच संकर्षणने आता अशी कामगिरी केली आहे ते पाहून नेटकरी त्याचे भरपूर कौतुक करत आहेत. मालिकांसह संकर्षण नाटकामध्ये देखील काम करतो. त्यामुळे नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने त्याला बऱ्याच वेळा प्रवास करावा लागतो. अलीकडेच […]

संकर्षण झाला बस चालक

मुंबई, २ जून २०२३, प्रतिनिधी : अभिनेता – लेखक संकर्षण कऱ्हाडे समाज माध्यमांवर नेहमीच सक्रिय असतो. त्याच्या अभिनयासह कवितांचे देखील अनेक चाहते आहेत. अशातच संकर्षणने आता अशी कामगिरी केली आहे ते पाहून नेटकरी त्याचे भरपूर कौतुक करत आहेत.

मालिकांसह संकर्षण नाटकामध्ये देखील काम करतो. त्यामुळे नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने त्याला बऱ्याच वेळा प्रवास करावा लागतो. अलीकडेच तो ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या प्रयोगासाठी कोथरूडला गेला होता. प्रयोग संपल्यानंतर परतताना बस चालकाची तब्येत अचानक बिघडली पण भास वेळी संकर्षणने पुढे येऊन चालकाची जागा घेत. बस चालवायला सुरुवात केली. हा व्हिडिओ प्रशांत दामलेंनी आपल्या इंस्टग्राम अकाउंटवर सामायिक केला आहे.

प्रशांत दामले यांनी संकर्षणचा एक व्हिडिओ इंस्टाग्राम वर सामायिक केला आहे. यात संकर्षण चक्क बस चालवताना दिसत आहे. याबद्दल प्रशांत दामलेंनी लिहिले की,” काल रात्री कोथरूडच्या प्रयोगाला आमचा चालक प्रवीण ह्याला बर वाटेनास झाल. साधारणपणे प्रयोग 12.30 ला संपल्यावर आम्ही सेट भरून जेवून पहाटे 2 च्या सुमारास मुंबईकडे निघतो.पण चालक आजारी पडला म्हटल्यावर सगळच थांबल. पण थांबेल तो संक्या कसला. त्याने चालकाला मागे झोपवल आणि स्वतः ड्राइवर सीटवर बसला आणि लोणावळ्यापर्यंत बस हाणली. त्याच्याकडे हेवीचा पण लायसन आहे हे कालच मला कळले. लोणावळ्याला ड्राइवर ओके आणि मग संक्या मागे जाऊन झोपला. इसको बोलता हैं जिगर नाटकाचे प्रयोग आणि बस एकाच स्पीड ने चालु आहेत.” हा विडिओ पाहून त्यःचे बरेच कौतुक केले जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number