Sanju Samson: भर सामन्यात थरार! संजू सॅमसनचा जोरदार चेंडू पंचांना लागला अन्… पाहा Video

भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० सामन्यात संजू सॅमसनच्या जोरदार फटक्यामुळे पंच रोहन पंडीत जखमी झाले.

Sanju Samson: भर सामन्यात थरार! संजू सॅमसनचा जोरदार चेंडू पंचांना लागला अन्… पाहा Video

Sanju Samson: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या पाचव्या टी-२० सामन्यात एक असा प्रसंग घडला, ज्यामुळे मैदानावरील खेळाडू, पंच आणि प्रेक्षक सगळेच काही क्षणांसाठी स्तब्ध झाले. संजू सॅमसनच्या जोरदार फटक्यानंतर अचानक पंच मैदानावर कोसळल्याचं दृश्य पाहून सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला.

सामन्याच्या नवव्या षटकात हा धक्कादायक प्रकार घडला. दक्षिण आफ्रिकेकडून डोनोवेन फेरेरिया गोलंदाजी करत होता आणि संजू सॅमसन स्ट्राइकवर होता. संजू त्या क्षणी उत्तम लयीत फलंदाजी करत होता. त्याच्या फटक्यांमध्ये ताकद आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दिसत होता. षटकाच्या चौथ्या चेंडूवर संजूने सरळ बॅटने जोरदार फटका मारला.

हा चेंडू इतक्या वेगाने पुढे गेला की गोलंदाजालाही त्याला थांबवणं कठीण झालं. चेंडू प्रथम गोलंदाजाच्या हाताला लागला, मात्र वेग इतका जास्त होता की तो तिथेच थांबला नाही. चेंडू थेट पंच रोहन पंडीत यांच्या पायावर आदळला. जोरदार आघात झाल्यामुळे पंच तात्काळ वेदनेने कळवळले आणि मैदानावर खाली कोसळले.

हेही वाचा: T20 World Cup 2026: ठरलं तर! टी-20 विश्वचषक 2026 साठी ‘या’ दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा

हा प्रसंग पाहताच मैदानात एकच खळबळ उडाली. काही क्षणांसाठी खेळ थांबवण्यात आला. संजू सॅमसन धावत पंचांकडे गेला आणि त्यांची विचारपूस केली. दक्षिण आफ्रिकेच्या वैद्यकीय पथकानेही तात्काळ मैदानात धाव घेतली आणि पंचांवर प्राथमिक उपचार सुरू केले. पंच खाली पडल्याचं दृश्य पाहून प्रेक्षकांमध्येही शांतता पसरली होती.

सुदैवाने पंचांना गंभीर दुखापत झाली नाही, मात्र त्या क्षणांनी मैदानावरील प्रत्येकाला हादरवून सोडलं. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अनेक क्रिकेटप्रेमी पंचांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त करत असून संजूच्या खेळातील ताकदीवरही चर्चा करत आहेत.

हेही वाचा: Kapil Dev on Gautam Gambhir : ‘गौतम गंभीर टीम इंडियाचा प्रशिक्षक नाही, तर व्यवस्थापक…’; कपिल देव यांच्या विधानाने क्रिकेट विश्वात नवा वाद

या घटनेनंतरही सामना पुन्हा सुरू झाला. मात्र काही वेळातच संजू सॅमसन बाद झाला. त्याने २२ चेंडूंमध्ये ३७ धावांची उपयुक्त खेळी साकारली. त्याच्या खेळीत चार चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. संजूची ही खेळी भारतासाठी महत्त्वाची ठरली, पण त्याचबरोबर त्याचा एक फटका किती धोकादायक ठरू शकतो, याचंही दर्शन या प्रसंगातून घडलं.

क्रिकेट हा वेगवान खेळ असला तरी अशा घटनांमुळे सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पंच आणि खेळाडू दोघांच्याही सुरक्षिततेसाठी योग्य काळजी घेणं किती आवश्यक आहे, हे या प्रसंगातून अधोरेखित झालं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number