आयपीएलच्या आगामी हंगामाची (IPL 2026) प्रतीक्षा आता संपली आहे. आयपीएल (IPL) च्या 19 व्या हंगामाचा बिगुल वाजला असून ही स्पर्धा 28 मार्चपासून सुरू होणार आहे. यावेळी सीएसके अर्थात चेन्नई सुपर किंग्स यंदा वर्ल्ड कप चॅम्पियन संजू सॅमसन याच्यासोबत आयपीएलच्या 19 व्या मोसमात खेळणार आहे. संजू सॅमसनने जास्त धावांची खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. संजूला त्याच्या या झंझावाती कामगिरीसाठी ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ (मालिकावीर) पुरस्काराने गौरवण्यात आले.
टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या अंतिम टप्प्यात निर्णायक कामगिरी करणाऱ्या संजू सॅमसनला यंदाच्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. रविंद जडेजाच्या बदल्यात झालेल्या ‘टू-वे ट्रेड’मध्ये तो चेन्नईत आला असून, तो या हंगामात CSK कडून खेळणार आहे. तो सलामीवीर म्हणून किंवा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची शक्यता आहे. संजू सॅमसन 2013-2015 आणि 2018-2025 या कालावधीत प्रामुख्याने राजस्थान रॉयल्ससोबत खेळला, ज्यामध्ये त्याने फ्रँचायझीसाठी एकूण 10 पेक्षा जास्त वर्षे घालवली. त्यानंतर आता यंदाच्या आयपीएल हंगामात तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसणार आहे.
हेही वाचा- Virat Kohli RCB Playing XI : कोहलीची धडकी भरवणारी RCB XI; अनेक वर्षे RCB साठी खेळलेल्या खेळाडूलाच डावललं
दरम्यान राजस्थान रॉयल्स संघाची साथ सोडल्यानंतर संजू सॅमसन आणि राजस्थान रॉयल्स संघाचे मालक या दोघांमध्ये काही कारणावरून वाद होत असल्याची चर्चा सुरु होती. यावर संजूने प्रतिक्रिया दिली असून राजस्थान रॉयल्स संघ सोडण्यामागचं कारण देखील स्पष्ट केलं आहे. “मी पहिल्यांदाच राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार आहे, पण मी मैदानावर भावनांना माझ्यावर हावी होऊ देत नाही. संघातील माझा काळ संपला आहे असे वाटल्यामुळे मी राजस्थान रॉयल्स सोडले. आता जरी त्यांच्याविरुद्ध सामना झाला, तरी मी माझा सर्वोत्तम खेळ करेन. माझं मुख्य ध्येय टीम मॅनेजमेंट आणि माही भाईने त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणं आहे. धोनीसोबत अनेकदा चर्चा झाली असली तरी, प्रत्यक्ष मैदानात त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. या संधीतून खूप काही शिकायला मिळेल” असं म्हणत संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्सची साथ सोडण्यामागचं कारण सांगितलं, तसेच सीएसकेमधील कॅप्टन्सीवर बोलताना देखील त्याने पूर्णविराम दिला आहे.
VIDEO | Thiruvananthapuram, Kerala: “This is the first time I will play against Rajasthan Royals, but I don't let emotions rule me on the field. I left Rajasthan Royals because I felt my time in the team was over. Even if we come up against them now, I will play my best cricket,”… pic.twitter.com/yhzyONME20 — Press Trust of India (@PTI_News) March 16, 2026