जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
पीएनबी महाघोटाळ्याचा सूत्रधार नीरव मोदीवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आशिष शेलार यांच्यात चांगलीच जुंपलीय.
मोदी आडनावावरून राऊत यांनी थेट नाव न घेता नरेंद्र मोदींवर निशाणा साधणारं ट्विट केलंय. तर काहींना गल्लीत बसून ‘मोदी’ या शब्दाचे यमक जुळवून टुकार काव्य सूचले.
तेव्हाच कळले आता ‘शिमगा’ जवळ आला आहे. वर्षभरच यांचा शिमगा असतो. उगाच यमकासाठी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न कशाला करताय. तीच थुंकी तोंडावर पडू नये म्हणजे झालं!.
ट्विटकरत आशिष शेलार यांनी राऊतांच्या ट्विटला प्रत्युतर दिलंय.