शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अलिबाग येथे जमीन मालकावर दबाव टाकून जमीन घेतली असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता, दरम्यान संजय राऊत यांना जमीन विकताना आमच्यावर राऊतांनी कोणताही दबाव टाकला नव्हता असा खुलासा जमिनीचे मूळ मालक चंद्रकांत भिडे यांनी केला आहे.
जमिनीच्या मूळ मालकांनी किरीट सोमय्या यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. खेळीमेळीच्या वातावरणात हा जमिनीचा व्यवहार पार पडला असून आमचे घरगुती संबंधदेखील चागंले असलयाचे हा व्यवहार झाला असल्याचे जमिनीचे मूळ मालक चंद्रकांत भिडे यांनी सांगितले आहे. तेसच १९९७साली ६० ते ७० हजारांमध्ये १ एकर जमीन विकली आणि संजय राऊतांच्या जमिनीचा व्यवहार पूर्णपणे पारदर्शक असल्याचे चंद्रकांत भिडे यांनी सांगितले आहे.