संजय राऊतांची चौकशी होणार; गृहमंत्र्यांनी दिले संकेत

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विविध मुद्यांसाठी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहे. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात तक्रारीची चौकशी कधी होणार? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. तर संजय राऊतांची चौकशी होणार असल्याचे संकेत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांविरोधात तसेच स्त्रियांविरोधात अश्लील शेरेबाजी केल्यामुळे त्यांच्याविरोधात मुंबई […]

संजय राऊतांची चौकशी होणार; गृहमंत्र्यांनी दिले संकेत

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विविध मुद्यांसाठी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहे. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात तक्रारीची चौकशी कधी होणार? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. तर संजय राऊतांची चौकशी होणार असल्याचे संकेत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांविरोधात तसेच स्त्रियांविरोधात अश्लील शेरेबाजी केल्यामुळे त्यांच्याविरोधात मुंबई भाजप महिला मोर्चेतर्फे मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र अद्याप संजय राऊत यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात तक्राराची चौकशी कधी होणार? असा सवाल भाजप महिला करत आहेत. त्यामुळे महिला सन्मान राखण्याबाबत शिवसेनेच्या लक्षवेधीने राऊतांची कोंडी झाली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी महिलांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे त्यांच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांनी अश्लील शेरेबाजी करत भाजपच्या महिला कार्यकर्त्यांच्या विनयभंग केला असून त्यांची प्रतिमा मलीन केली आहे. अशी तक्रार भाजप महिलांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number