‘संजय राऊत पुराव्याशिवाय बोलतात’ – किरीट सोमैया

भाजप नेते किरीट सोमैयांना आयएनएस विक्रांत युद्धनौका निधीप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने सोमैयांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर किरीट सोमैया मंबईत परतले आहेत. तसेच मुंबईत येताच त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत पुराव्याशिवाय बोलत असल्याचे किरीट सोमैयांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. सोमैयांवर […]

‘संजय राऊत पुराव्याशिवाय बोलतात’ – किरीट सोमैया

भाजप नेते किरीट सोमैयांना आयएनएस विक्रांत युद्धनौका निधीप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने सोमैयांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर किरीट सोमैया मंबईत परतले आहेत. तसेच मुंबईत येताच त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत पुराव्याशिवाय बोलत असल्याचे किरीट सोमैयांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. सोमैयांवर विक्रांत बचाव मोहिमेत अपहार केल्याचा आरोप फेटाळून या मोहिमेत अपहार केला नसल्याचा दावा किरीट सोमैया यांनी केला आहे.

सोमैयांचा अटकपूर्व जामीन मंजूर

आयएनएस विक्रांत निधीप्रकरणी भाजप नेते किरीट सोमैयांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने किरीट सोमैयांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तसेच अटक झाल्यास ५० हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तर, सोमवारी १८ एप्रिलपासून सलग चार दिवस चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देशही न्यायालयाने सोमैयांना दिले आहेत.

संजय राऊतांनी सोमैयांवर केलेले आरोप

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेता किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. विक्रांत युद्धनौकेच्या नावावर ५८ कोटी रुपयांची रक्कम लाटली असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. संजय राऊतांनी आरोप केला की, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०१४ साली विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत ५७ ते ५८ कोटी रुपयांची रक्कम झाली होती. पण ही रक्कम राज्यपाल कार्यालयात पोहचले नसल्याचे समोर आले आहे. सोमय्यांनी विक्रांत युद्धनौकेच्या नावावर लाटलेली रक्कम २०१४च्या निवडणूकीसाठी आणि त्यांच्या निकॉन इन्फ्रा कंपनीत वळवला आहे. हा घोटाळा म्हणजे किरीट सोमय्यांनी देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी, राष्ट्रीय भावनेशी केलेली प्रतरणा आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number