संजय राऊत यांचा ‘जय महाराष्ट्र’वर ‘भारत बंद’संदर्भात मोठा गौप्यस्फोट!

भाजपा सरकारविरोधात पुकारलेल्या भारत बंदमध्ये शिवसेना सहभागी न होण्याचं कारण शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी ‘जय महाराष्ट्र’च्या दिलखुलास मुलाखतीदरम्यान जाहीर केलंय.‘मुंबई बंद’ शिवसेनेशिवाय शक्यच नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला. शिवसेनेची ताकद काय असते ते बंददरम्यान मुंबई सुरू राहिल्यानेच दिसून आली, असंही त्यांनी सांगितलं. …तर भाजपाला आणखी मोठा धक्का बसला असता! ‘भारत बंद’मधून शिवसेना […]

संजय राऊत यांचा ‘जय महाराष्ट्र’वर ‘भारत बंद’संदर्भात मोठा गौप्यस्फोट!

भाजपा सरकारविरोधात पुकारलेल्या भारत बंदमध्ये शिवसेना सहभागी न होण्याचं कारण शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी ‘जय महाराष्ट्र’च्या दिलखुलास मुलाखतीदरम्यान जाहीर केलंय.
‘मुंबई बंद’ शिवसेनेशिवाय शक्यच नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला. शिवसेनेची ताकद काय असते ते बंददरम्यान मुंबई सुरू राहिल्यानेच दिसून आली, असंही त्यांनी सांगितलं.

…तर भाजपाला आणखी मोठा धक्का बसला असता!


‘भारत बंद’मधून शिवसेना लांब राहण्यामागचं महत्त्वाचं कारण त्यांनी जाहीर केलंय. लोकसभेच्या पालघर पोटनिवडणुकीवेळी काँग्रेस आणि डाव्यांनी पाठिंबा देण्याऐवजी उमेदवार उभे केल्यानेच शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला होता. केवळ आठवड्याभरात शिवसेनेने अडीच लाखांच्या मतांचा टप्पा गाठला होता. जर, काँग्रेस आणि डाव्यांनी भाजपाविरोधात शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असता, तर भंडारा-गोंदिया निवडणुकीप्रमाणेच भाजपाला मोठा धक्का देता आला असता, असं राऊत म्हणाले. म्हणूनच काँग्रेस तसंच डाव्यांच्या ‘भारत बंद’ला पाठिंबा देण्यापासून शिवसेना लांब राहिली, असे सूतोवाचही त्यांनी केले.

 

मुंबईत ताकद शिवसेनेचीच!


तर, शिवसेना दूर राहिली असली, तरी मनसेने भारत बंदला पाठिंबा देत मुंबईमध्ये आपली ताकद दाखवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. थोडक्यात, ‘भारत बंद’ला महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी इतर राज्यातल्या काही भागात ‘भारत बंद’ यशस्वी झाल्याचेही चित्र पाहायला मिळाले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number