जुलै महिन्यात राजकीय भूकंप होईल; संजय राऊतांचे सनसनाटी भाकित

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   जुलै महिन्यात राजकीय भूकंप होईल असं सनसनाटी भाकित शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वर्तवलं आहे.   राज्य सरकारला नेहमीच गोत्यात आणणाऱ्या शिवसेनेच्या या नव्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.   मित्रपक्ष भाजपच शिवसेनेला संपवण्यासाठी वेगवेगळ्या खेळी करत आहे.   त्यामुळे आता शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जुलै महिन्यात शिवसेना […]

जुलै महिन्यात राजकीय भूकंप होईल; संजय राऊतांचे सनसनाटी भाकित

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

जुलै महिन्यात राजकीय भूकंप होईल असं सनसनाटी भाकित शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वर्तवलं आहे.

 

राज्य सरकारला नेहमीच गोत्यात आणणाऱ्या शिवसेनेच्या या नव्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.

 

मित्रपक्ष भाजपच शिवसेनेला संपवण्यासाठी वेगवेगळ्या खेळी करत आहे.

 

त्यामुळे आता शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जुलै महिन्यात शिवसेना राजकीय लढाई सुरु करेल.

 

तेव्हा या लढाईसाठी सज्ज राहा असं आवाहनच संजय राऊत यांनी शिवसैनिकांना केले.

 

शेतकरी कर्जमाफीसाठी स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीमध्ये दिवाकर रावते सहभागी होतील आणि शिवसेनेची ठाम भूमिका मांडतील असंही त्यांनी स्पष्ट केले

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number