जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता असल्यानं शिवसेना तयारीला लागलीय. त्याच अनुषंगानं पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा निहाय पदाधिकाऱ्यांची बैठक आज खासदार संजय राऊत यांनी घेतली.
शिवसेना मध्यावधी निवडणुकीसाठी सज्ज असून, हिम्मत असेल तर निवडणुका लावाव्यात असं आव्हान राऊत यांनी यावेळी भाजपला दिलं.
तर, कर्जमाफीसाठी आता नवं अल्टिमेटम देणार नसून, रोज त्यांना कानफडत राहू असं ही राऊत यांनी स्पष्ट केलं.