संजय राऊत ईडीसमोर हजर

शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे केंद्रीय यंत्रणाच्या रडारवर आहेत. दोन दिवसांपूर्वीच ईडीने संजय राऊतांना समन्स पाठवले होते. त्यानुसार राऊत शुक्रवारी ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहिले आहेत. ‘ईडीने पाठवलेल्या समन्सचा मी आदर करतो आणि केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे मी चौकशीला हजर होणार आहे. तसेच मी चौकशीला गेल्यानंतर ईडी कार्यालयासमोर गर्दी न […]

संजय राऊत ईडीसमोर हजर

शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे केंद्रीय यंत्रणाच्या रडारवर आहेत. दोन दिवसांपूर्वीच ईडीने संजय राऊतांना समन्स पाठवले होते. त्यानुसार राऊत शुक्रवारी ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहिले आहेत.

‘ईडीने पाठवलेल्या समन्सचा मी आदर करतो आणि केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे मी चौकशीला हजर होणार आहे. तसेच मी चौकशीला गेल्यानंतर ईडी कार्यालयासमोर गर्दी न करण्याचे आवाहन संजय राऊतांनी शिवसैनिकांना ट्विट करत केले आहे.’

काय आहे प्रकरण?

ई़डीने संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात चौकशी करण्यासाठी समन्स पाठवले आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात ईडीने पत्राचाळ प्रकरणातच संजय राऊत यांच्या मुंबई आणि अलिबाग येथील मालमत्ता जप्त केल्या होत्या. यामध्ये संजय राऊत यांच्या मुंबईतील राहत्या घराचाही समावेश होता. गोरेगावमधील पत्राचाळ जमीन प्रकरणात १०३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. यापैकी काही पैसे संजय राऊत यांना मिळाल्याचा आरोप आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number