जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
भाजपच्या हिंदुत्ववादी आणि भगव्या अजेंडाचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेसने नवा अजेंडा सुरु केला आहे. त्यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुंबई संत
महंत यांची संघटना तयार करून कॉंग्रेसच्या बॅनर खाली या संत महंतांचे व्यासपीठावर चक्क पाय धुतले.
काँग्रेसच्या या नव्या सेलच्या पहिल्या बैठकिला संजय निरुपम महंतांना मंचावर सोबत घेवून बसलेले बघायला मिळाले. मात्र, या मंचावर निरुपम यांच्या व्यतिरीक्त
काँग्रेसचा कुठलाही नेता नव्हता.
काँग्रेसची प्रतिमा हिंदुविरोधी पक्ष म्हणून केली जातेय असं वक्तव्य निरुपम यांनी केले. त्यामुळे संत-महंतांच्या माध्यमातून काँग्रेसची प्रतिमा बदलण्यासाठी तर संजय
निरुपमांना ही भूमिका घेतली की काय या चर्चांना उधाण आले.