जय महाराष्ट्र न्यूज, मुबंई
भाजप आमदार अमित साटम यांनी पालिकेच्या अभियंत्याला अर्वाच्य शिवीगाळ केल्याचा आरोप होत असताना आता मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी याप्रकरणी भाष्य केलंय.
“आपल्या बचावासाठी त्यांनी आवाज आपला नसल्याचा सांगितलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले. याप्रकरणी नेमकं खरं काय आहे, हे तपास यंत्रणा उघड करेल.
परंतु, तपास यंत्रणेवर आता नागरिकांचा विश्वास राहिला नाही, असे सांगत तपास यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही निरुपम यांनी संशय व्यक्त केलाय.