Sanjay Ghadi: ट्रॅफिकमुळे मानसिक-शारीरिक त्रास; उपमहापौर संजय घाडींची शहरात घरासाठी मागणी, अश्विनी भिडेंना लिहिलं पत्र

यासंदर्भात त्यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे.

Sanjay Ghadi: ट्रॅफिकमुळे मानसिक-शारीरिक त्रास; उपमहापौर संजय घाडींची शहरात घरासाठी मागणी, अश्विनी भिडेंना लिहिलं पत्र

मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे बैठका आणि प्रशासकीय कामकाजासाठी वेळेत पोहोचणे कठीण होत असल्याचे सांगत मुंबई महापालिकेचे उपमहापौर संजय घाडी यांनी शहर भागात अधिकृत निवासस्थानाची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पश्चिम उपनगरातील दहिसर येथे राहणारे संजय घाडी यांना मुंबई महापालिकेतील विविध बैठका, कार्यक्रम आणि तातडीच्या प्रशासकीय कामांसाठी वारंवार दक्षिण मुंबईत ये-जा करावी लागते. मात्र, प्रचंड वाहतूक कोंडीमुळे वेळेत पोहोचण्यात अडचणी निर्माण होत असल्याने त्यांनी शहरात अधिकृत निवासाची मागणी केली आहे.

यासाठी भायखळ्यातील राणीच्या बाग परिसरात असलेल्या महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या रिक्त सेवानिवास बंगल्याचा पर्याय पुढे आल्याचे सांगितले जात आहे. महापौरांच्या अधिकृत निवासस्थानालगत असलेल्या या बंगल्यासाठी उपमहापौर प्रयत्नशील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

उपमहापौरांच्या या मागणीवर पालिका प्रशासन काय भूमिका घेते आणि आयुक्त अश्विनी भिडे यांचा याबाबत काय निर्णय होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, यासंदर्भात मुंबई महापालिका प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number