Sanjay Dutt Restaurant Controversy: जिवंत माशाच्या कॉकटेलनं पेटला वाद! संजय दत्तच्या रेस्टॉरंटला अखेर मेन्यूमधून काढावं लागलं पदार्थाचं नाव; नेमकं काय घडलं?

संजय दत्तच्या रेस्टॉरंटमधील जिवंत माशाच्या कॉकटेलमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त झाला असून वाढत्या टीकेनंतर हा कॉकटेल मेन्यूमधून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

Sanjay Dutt Restaurant Controversy: जिवंत माशाच्या कॉकटेलनं पेटला वाद! संजय दत्तच्या रेस्टॉरंटला अखेर मेन्यूमधून काढावं लागलं पदार्थाचं नाव; नेमकं काय घडलं?

Sanjay Dutt Restaurant Controversy: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, मात्र यावेळी कारण त्याचा चित्रपट नसून त्याच्या रेस्टॉरंटमधील एक वादग्रस्त कॉकटेल ठरलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे या कॉकटेलवर मोठा वाद निर्माण झाला असून, अखेर हा आयटम मेन्यूमधून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या रेस्टॉरंट-बारमध्ये एक वेगळ्या प्रकारचं कॉकटेल सादर करण्यात आलं होतं. या कॉकटेलमध्ये जिवंत मासा वापरल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे, त्या कॉकटेलमध्ये मासा तरंगताना आणि त्याच्यावर आगीचा इफेक्ट दाखवण्यात आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा:Yo Yo Honey Singh Pune Concert : हनी सिंगमागील साडेसाती काही सुटेना! मुंबईनंतर पुण्यातील आगामी कॉन्सर्टही वादात, पंजाबच्या व्यक्तीनेच लिहिलं पत्र

प्राण्यांबाबत संवेदनशील असलेल्या अनेक युजर्सनी या प्रकारावर आक्षेप घेतला. काही प्राणीमित्र संघटनांनीही या प्रकरणात आवाज उठवत, अशा प्रकारे जिवंत प्राण्यांचा वापर करणे चुकीचे असल्याचं सांगितलं. सोशल मीडियावर या कॉकटेलविरोधात संतापाची लाट उसळली आणि अनेकांनी याला अमानुष कृत्य असल्याचं म्हटलं.

वाढत्या टीकेनंतर संबंधित रेस्टॉरंटने या प्रकरणाची दखल घेतली. त्यांनी अधिकृतपणे जाहीर केलं की, ग्राहकांच्या भावना लक्षात घेऊन हा कॉकटेल प्रकार तात्काळ बंद करण्यात येत आहे. तसेच, प्राण्यांच्या सुरक्षेला आणि संवेदनशीलतेला ते नेहमीच प्राधान्य देतात, असंही स्पष्ट करण्यात आलं.

रेस्टॉरंटच्या म्हणण्यानुसार, हा कॉकटेल केवळ एका संकल्पनेवर आधारित होता आणि कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मात्र, लोकांच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी निर्णय बदलला. हा निर्णय घेतल्यानंतर काहींनी त्याचं स्वागत केलं, तर काहींनी सुरुवातीलाच अशी कल्पना का राबवली, असा सवाल उपस्थित केला.

हेही वाचा:Sonali Kulkarni on Ashok Kharat: ‘आपल्या उंबरठ्यावरची घाण साफ करायलाच हवी’; अशोक खरात प्रकरणावरील सोनाली कुलकर्णीची पोस्ट व्हायरल

या घटनेमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा प्राण्यांच्या हक्कांबाबत चर्चा सुरू झाली आहे. मनोरंजन किंवा वेगळेपणा दाखवण्यासाठी अशा गोष्टींचा वापर कितपत योग्य आहे, यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

एका वेगळ्या प्रयोगामुळे सुरू झालेला हा वाद मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आणि अखेरीस संबंधित रेस्टॉरंटला आपला निर्णय मागे घ्यावा लागला. या घटनेतून सोशल मीडियाची ताकद आणि लोकांच्या भावना लक्षात घेण्याचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number