संजय दत्तने विकत घेतला क्रिकेट संघ

मुंबई, २३ जून २०२३, प्रतिनिधी : बॉलीवूडचे कलाकार आणि क्रिकेट यांच एक वेगळं नातं आहे. अनेक सिनेकलाकार, उद्योजपती वेगवेगळ्या खेळांमधील संघ विकत घेता असतात. अशातच आता अभिनेता संजय दत्तने ही एक क्रिकेट टीम विकत घेतली आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या संजू बाबाने एक टिम विकत घेत क्रिकेटमध्ये झकास एन्ट्री केली आहे. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड […]

संजय दत्तने विकत घेतला क्रिकेट संघ

मुंबई, २३ जून २०२३, प्रतिनिधी : बॉलीवूडचे कलाकार आणि क्रिकेट यांच एक वेगळं नातं आहे. अनेक सिनेकलाकार, उद्योजपती वेगवेगळ्या खेळांमधील संघ विकत घेता असतात. अशातच आता अभिनेता संजय दत्तने ही एक क्रिकेट टीम विकत घेतली आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या संजू बाबाने एक टिम विकत घेत क्रिकेटमध्ये झकास एन्ट्री केली आहे.

झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड ‘जिम एफ्रो टी 10’या टूर्नामेंटचे आयोजन करणार आहे. तर 20 जूलै पासून सुरु होणाऱ्या या टूर्नामेंटमध्ये संजय दत्तने एंट्री करत “हरारे हरिकेन्स” हा संघ विकत घेतला आहे. संजय दत्तने एरीज ग्रुप ऑफ कंपनीजचे सर सोहन रॉय यांच्यासह्यपगाने हा संघ विकत घेतला आहे.

झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डतर्फे आयोजित या स्पर्धेत 5 संघ खेळणार आहेत.संजय दत्तने संघ विकत घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आनंद व्यक्त केला आहे. हरारे हरिकेन्स स्पर्धेत चांगली कामगिरी करुन प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करेल, असं संजय दत्तने सांगितलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number