अभिनेता संजय दत्त यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. नागपुरातील गडकरी यांच्या निवासस्थानी रविवारी संध्याकाळी संजय दत्त व गडकरींचा ही भेट झाली. संध्याकाळी मुंबईहून नागपूर विमानतळावर आलेल्या संजय दत्त यांनी थेट गडकरींचे निवासस्थान गाठले. संजय दत्त यांनी घेतली गडकरींची भेट सुमारे 1 तास गडकरी व संजय दत्त यांच्यात चर्चा झाली. यावेळी गडकरी […]

अभिनेता संजय दत्त यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. नागपुरातील गडकरी यांच्या निवासस्थानी रविवारी संध्याकाळी संजय दत्त व गडकरींचा ही भेट झाली. संध्याकाळी मुंबईहून नागपूर विमानतळावर आलेल्या संजय दत्त यांनी थेट गडकरींचे निवासस्थान गाठले.

संजय दत्त यांनी घेतली गडकरींची भेट

सुमारे 1 तास गडकरी व संजय दत्त यांच्यात चर्चा झाली. यावेळी गडकरी यांच्या निवासस्थानी संजय दत्त यांनी जेवणही घेतले. गडकरींची भेट घेतल्यावर संजय दत्त विमानाने मुंबई करीता रवाना झाले.

संजय दत्त यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबतची ही वयक्तिक व सदिच्छा भेट असल्याचे बोलल्या जात आहे.तरीही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय दत्त व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यातील भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरू शकतो.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आपल्या पक्षात येण्यास इच्छुक आहे आणि लवकरच तो रासप मध्ये प्रवेश करणार असल्याचे रासपचे अध्यक्ष मंत्री महादेव जानकर यांनी आपल्या पक्षाच्या वर्धापनदिनी बोलताना म्हटले होतो. ते प्रवेश करणार होते ते बाहेर गावी असल्याने 25 सप्टेंबर ला ते प्रवेश करणार असल्याचे जानकर यावेळी म्हणाले होते.

परंतु संजय दत्त यांनी मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे त्यावेळी जाहीर केलं. आणि आता नितीन गडकरी यांची भेट घेतल्याने पुन्हा नव्या चर्चेला उधाण आलं आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number