Sangli News : जत तालुक्याती खाटली गावात हृदयद्रावक घटना, वादळी वाऱ्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू

जत तालुक्यातील खलाटी येथे काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या वादळी वाऱ्यात जत तालुक्याती खाटली गावात एका चिमुरड्याने जीव गमावला आहे.

Sangli News : जत तालुक्याती खाटली गावात हृदयद्रावक घटना, वादळी वाऱ्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू

जत तालुक्यातील खलाटी येथे काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या वादळी वाऱ्यामुळे खलाटी येथील शेजुळ वस्तीवरील आनंदा शेजुळ यांच्या घरावरील पत्रे उडून गेली. यावेळी घरातील पाळण्यात झोपलेला अवघ्या 9 महिन्यांचा श्रीवर्धन आनंदा शेजुळ हा चिमुकला वार्‍यामुळे पाळण्यासह फेकला गेला, ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पाळणा दूर जाऊन पडल्याने बाळ त्यातून बाहेर पडले व जागीच त्याचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण खलाटी परिसरात शोककळा पसरली असून शेजुळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा- Uttar Pradesh News : वादळी पावसामुळे उत्तर प्रदेशात विध्वंस; आतापर्यंत 74 जणांचा मृत्यू तर शेकडो जखमी, नागरिक धास्तावले
दरम्यान सांगली जिल्ह्यातल्या जत आणि मिरज तालुक्याला वादळी वाऱ्याचा प्रचंड तडाखा बसला आहे. सुमारे दीडशेहून अधिक घरांचे, गोट्यांचे, शेडचे पत्रे व कौल उडून गेली आहे. यामुळे दोन जण जखमी देखील झाले आहेत. जत तालुक्यातील कुणीकोनूर सह आसपासच्या गावांमध्ये वादळी वाऱ्याने घरांचा मोठी पडझड झाली आहे. जत तालुक्यात जवळपास 100 हुन अधिक घरे, गोट्यांचे छत उडून गेले आहेत. तर काही ठिकाणी भिंती देखील कोसळले आहेत.

त्याचबरोबर अनेक ठिकाणी विद्युत खांब कोसळली असून अनेक रस्त्यांवरील झाड देखील उन्मळून पडले आहेत. मिरज तालुक्यातील पूर्वभागाला देखील वादळीवारयाचा मोठा फटका बसला आहे, खटाव, बेळंकी, लिंगनूर, सलगरे सह आसपासच्या गावांमध्ये वादळी वाऱ्याचा कहर झाला आहे, त्यामुळे घरे, शेड, गोठयांची पत्रे उडून गेली आहेत, तसेच अनेक ठिकाणी झाडे देखील उन्मळून पडली आहेत. विद्युत खांबे देखील वाकल्याने अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number