म्हैस शोधा आणि 10 हजारांचे बक्षीस मिळवा; फेसबुकवर पोस्ट व्हायरल

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली   म्हैस शोधून द्या 10 हजार बक्षीस मिळवा अशी आगळी वेगळी पोस्ट सध्या सांगलीच्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. सांगली मधील सोमनाथ सूर्यवंशी याची पंढरी या नावाची म्हैस गेल्या चार दिवसांपासून चोरीला गेली आहे. अत्यंत जीवाळा लावणारी या पंढरी म्हशीला शोधण्यासाठी पोलिसांचे पथक ही रवाना झाले आहे. सोमनाथ सूर्यवंशी हे […]

म्हैस शोधा आणि 10 हजारांचे बक्षीस मिळवा; फेसबुकवर पोस्ट व्हायरल

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

म्हैस शोधून द्या 10 हजार बक्षीस मिळवा अशी आगळी वेगळी पोस्ट सध्या सांगलीच्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

सांगली मधील सोमनाथ सूर्यवंशी याची पंढरी या नावाची म्हैस गेल्या चार दिवसांपासून चोरीला गेली आहे. अत्यंत जीवाळा लावणारी या पंढरी म्हशीला शोधण्यासाठी पोलिसांचे पथक ही रवाना झाले आहे.

सोमनाथ सूर्यवंशी हे गेल्या अनेक वर्षांपासून जनावरे पाळतात. त्याच्याकडे तब्बल 11 जनावरे आहेत. त्यातीलच ही एक पंढरपुरी अर्थातच पंढरी म्हैस या म्हशींवर सूर्यवंशी याच्या कुटुंबाचा फार जीवाळा होता.

घरातील प्रत्येक जण पंढरी म्हणून तिला हाक मारत असे. पण शनिवारी रात्री पंढरी गायब झाली आहे. तिचा शोध गेल्या चार दिवसांपासून कुटुंब घेत आहे. पण तिचा काहीच ठाव ठिकाणा लागत नाही.

अखेर सोमनाथ सूर्यवंशी यांनी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. त्यांनी काल रात्री फेसबुक वर पोस्ट टाकली आमची जिवा भावाची म्हैस चोरीला गेली आहे. कोणास मिळाली तर आणून द्यावी आणि त्या व्यक्तीस 10 हजाराचे बक्षीस दिले जाईल अशी पोस्ट फिरवली आहे. या पोस्ट ला अनेक जणांचे लाईक ही मिळाले आहेत.

सोमनाथ सूर्यवंशी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात म्हैस चोरीला गेली असल्याची तक्रार ही दिली आहे. पोलिसांनी या म्हशीला शोधण्यासाठी एक पथक ही रवाना केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number