सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत 14 कोटी 72 लाखांच्या जुन्या नोटा पडून!

रिझर्व्ह बँकेकडे जमा करण्यास सांगली बँकेचा पाठपुरावा सुरू; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल, केंद्र सरकारकडेही मागणी

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत 14 कोटी 72 लाखांच्या जुन्या नोटा पडून!

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत 14 कोटी 72 लाखांच्या जुन्या नोटा धूळखात

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत तब्बल 14 कोटी 72 लाख रुपयांच्या जुन्या नोटा अजूनही पडून आहेत. नोटाबंदीनंतर रद्द झालेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा अद्याप बँकेच्या तिजोरीत आहेत. या नोटा रिझर्व्ह बँकेकडे जमा करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून वारंवार पाठपुरावा सुरू आहे, मात्र अद्याप त्यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.

बँकेचा सर्वोच्च न्यायालय व केंद्र सरकारकडे पाठपुरावा
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने या नोटांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, तसेच केंद्रीय अर्थ सचिवांकडेही दावा दाखल केला आहे. मात्र, या प्रकरणावर अद्याप सुनावणी पूर्ण झालेली नाही.

मुदतीत पैसे न भरल्याने अडचण
रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, दिलेल्या मुदतीत पैसे भरले नसल्याने या नोटा स्वीकारल्या जात नाहीत. त्यामुळे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे असलेल्या 14 कोटी 72 लाखांच्या नोटा धूळखात पडलेल्या आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी, शिवाजी वाघ यांचे मत
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी वाघ यांनी सांगितले की, या नोटांच्या बाबतीत आम्ही रिझर्व्ह बँक, सर्वोच्च न्यायालय व केंद्रीय अर्थ सचिवांकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. तरीही अद्याप काही तोडगा निघालेला नाही.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय; 17 वर्षीय गर्भवतीला गर्भपातास परवानगी

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number