जय महाराष्ट्र न्यूज, सांगली महाराष्ट्र बंदचे लोण आता महाराष्ट्रात पसरू लागलं आहे. शेतकरी संपाला पाठिंबा म्हणून सांगलीतील व्यापाऱ्यांनी बाजापेठेतील दुकाने बंद ठेवली. आज सकाळपासूनच सांगलीच्या बाजारपेठात शुकशुकाट पसरला आहे. सांगलीच्या व्यापारी बांधवांनी शेतकरी संपाला पाठिंबा दिल्याने आज दिवसभर सांगली शहरात कडकडीत बंद पाळला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात […]
महाराष्ट्र बंदचे लोण आता महाराष्ट्रात पसरू लागलं आहे. शेतकरी संपाला पाठिंबा म्हणून सांगलीतील व्यापाऱ्यांनी बाजापेठेतील दुकाने बंद ठेवली.
आज सकाळपासूनच सांगलीच्या बाजारपेठात शुकशुकाट पसरला आहे. सांगलीच्या व्यापारी बांधवांनी शेतकरी संपाला पाठिंबा दिल्याने आज दिवसभर सांगली शहरात कडकडीत बंद पाळला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.