Homeमहाराष्ट्र ...म्हणून शिवसेनेने झाडांना हार,फुल वाहत केली श्रद्धांजली अर्पण
…म्हणून शिवसेनेने झाडांना हार,फुल वाहत केली श्रद्धांजली अर्पण
जय महाराष्ट्र न्यूज, सांगली सांगलीत धोकादायक आणि वाहतुकीला अडथळा ठरणारे झाडं पालिकेकडून तोडले जातायंत. त्याच्याच विरोधात शिवसेनेनं सांगतील अनोखे आंदोलन केलंय. झाडांच्या भोवती पूजेसह हार, फुले गुलाल वाहून श्रद्धांजली वाहण्यात आलीय. तोडण्यात आलेल्या झाडांना यावेळी श्रद्धांजली वाहत शिवसेनेनं आंदोलन केलंय. मनमानी कारभार करणाऱ्या नगरसेवकांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी ही शिवसैनिकांनी यावेळी केली आहे.