जय महाराष्ट्र न्यूज, सांगली
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासाला सुरवात झालीय. शिवप्रतिष्ठानच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सामुदायिक मुंडन करीत संभाजी महाराजांच्या प्रति आपल्या भावना व्यक्त केल्या.
संभाजी महाराजांना एक महिना अत्यंत हाल हाल करून मारण्यात आले. त्यामुळे हा एक महिना शिवप्रतिष्ठाण कडून बलिदान मास म्हणून पाळला जातो. या महिनाभराच्या काळात कोणी गोड वर्ज्य करते, कोणी आनंदाच्या कार्यक्रमास जात नाही, कोणी चप्पल सोडतो. तर एक महिन्यानंतर संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा काढून महाराजांच्या प्रतिकात्मक पार्थिवाला अग्नी दिला जातो.