जय महाराष्ट्र न्यूज, सांगली
यशवंतपूर-अजमेर एक्स्प्रेस या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या राजस्थानच्या एका महिलेने रेल्वेतच गोडसं बाळाला जन्म दिलाय.
मिरजेच्या रेल्वे स्टेशनवर हा प्रकार घडलाय…प्रवासावेळी या महिलेच्या पोटात दुखू लागले. ‘कोणी डॉक्टर आहे का,’ असं मिरज स्थानकात पुकारण्यात आले.
सुदैवानं एक महिला डॉक्टर तेथे उपस्थित होत्या. डॉक्टरनं उपचार सुरू करताचं काही वेळातच महिलेनं बाळाला जन्म दिला.
दरम्यान, बाळ आणि बाळंतीण महिला सुखरूप आहेत. त्यांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.