जय महाराष्ट्र न्यूज, सांगली
सांगलीत निवडणूक प्रक्रियेसाठी भानामतीचा प्रकार धक्कादायक प्रकार घडलाय.
निवडून येण्यासाठी चक्क करणीचा वापर केला गेलाय. सांगलीच्या हरिपूर गावाजवळच्या वेशीवर चक्क 17 बाहुल्या सापडल्यायंत.
या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्टात केवळ एखादी निवडणूक जिंकण्यासाठी असा प्रकार घडणं हे अतिशय निंदनीय असल्याचं मत आता जनमानसातून व्यक्त केलं जातं.