वृत्तसंस्था, नवी दिल्ली
सॅमसंगने ड्यूएअ डिस्प्ले असलेला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. मागील वर्षी सॅमसंगने W2017 फ्लिप फोन हा लाँच केला होता. आता सॅमसंगनं याचं नवं व्हेरिएंट
SM-G9298 लाँच केला आहे.
दोन स्क्रीन हे या फ्लीप स्मार्टफोनचे वैशिष्ट्य आहे.
हा फोन सध्या फक्त ब्लॅक रंगात उपलब्ध आहे. हा फोन दिसायला एकदम आकर्षक आहे.
कंपनीनं अद्याप या फोनच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
सॅमसंग SM-G9298 स्मार्टफोनचे बेस्ट फिचर्स
– ड्यूल सिम सपोर्ट
– 4.2 इंच ड्यूल स्क्रिन
– रेझ्युलेशन 1080×1920 पिक्सल डिस्प्ले
– स्नॅपड्रॅगन 821 चिपसेट प्रोसेसर
– 4 जीबी रॅम
– 12 मेगापिक्सल रिअर कॅमेरा
– 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
– 64 जीबी इंटरनल मेमरी
– 2300 mAh बॅटरी