सॅमसंगच्या बजेट स्मार्टफोनच्या किंमतीत दोन हजारांची घसघशीत सूट

वृत्तसंस्था, नवी दिल्ली साउथ कोरियन टेक्नॉलजीच्या सॅमसंग मोबाईल कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाईलच्या किंमती कमी केल्या आहेत. गॅलेक्सी J7 प्राईम आणि गॅलेक्सी J5 प्राईम या दोन्ही मोबाईच्या लाँचींग किंमतीपेक्षा दोन हजार रूपयांची भरघोस सूट दिली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सॅमसंगने हे दोन स्मार्टफोन बाजारात आणले होते.त्यावेळी गॅलेक्सी J5 प्राईमची किंमत 14,990 रूपये तर, गॅलेक्सी […]

सॅमसंगच्या बजेट स्मार्टफोनच्या किंमतीत दोन हजारांची घसघशीत सूट

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

साउथ कोरियन टेक्नॉलजीच्या सॅमसंग मोबाईल कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाईलच्या किंमती कमी केल्या आहेत. गॅलेक्सी J7 प्राईम आणि गॅलेक्सी J5 प्राईम या दोन्ही मोबाईच्या लाँचींग किंमतीपेक्षा दोन हजार रूपयांची रघोस सूट दिली आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सॅमसंगने हे दोन स्मार्टफोन बाजारात आणले होते.त्यावेळी गॅलेक्सी J5 प्राईमची किंमत 14,990 ूपये तर, गॅलेक्सी J7 प्राईम 16,990 रूपये इतकी होती.

5 इंचाचा एचडी डिस्प्ले असलेला गॅलेक्सी J5 प्राईम आता 12,990 रूपयांना बाजारात उपलब्ध आहे. तर 5.5 एचडी डिस्प्ले असलेल्या गॅलेक्सी J7 प्राईम प्राईमची किंमत 14,990 रुपये इतकी आहे.

दोन्ही स्मार्टफोनमध्ये 3GB रॅमसह 32 GB इंटरनल मेमरी आहे. गॅलेक्सी J7  प्राईममध्ये 1.6GHZ प्रोसेसर असल्याने तो इतर वेरियंटच्या तुलनेत फास्ट आहे. 3,300mAh ची मोठी बॅटरी त्यात वापरण्यात आली आहे. मात्र; हा स्मार्टफोनला फास्ट चार्जिंगला सपोर्ट करत नाही.

सध्या भारतीय बाजारपेठे या दोन स्मार्टफोनला अनेक प्रतिस्पर्धी आहेत. 

बाजारातील शाओमीचा MI A1 आणि Moto G5 plus हे एकाच सेग्मेंटचे स्मार्टफोन आहे. हार्डवेयर, परफॉर्मेंस आणि कॅमेरचा विचार केला असता, सॅमसंगचे हे दोन स्मार्टफोन नवीन लाँच झालेल्या इतर कंपनींच्या स्मार्टफोनच्या तुलनेत मागे पडताना दिसत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number