जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
ठाणे, नाशिकच्या शेतकऱ्यांनी बहुचर्चित मुंबई-नागपूर महामार्गाला विरोध केल्यानं सरकारनं पर्यायी मार्गाचा विचार सुरू केलाय.
हा नवा मार्ग पुण्याहून नेण्याचा विचार आहे. समृद्धी मार्गाला जमीन देण्यास ठाणे, नाशिक आणि नगरच्या शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला.
दिवसेंदिवस हा विरोध तीव्र होत असून इतर राजकीय पक्षांचाही त्यांना पाठिंबा मिळाल्यानं प्रकल्पाविरोधातील वातावरण तापलंय. त्यामुळे समृद्धी महामार्गासाठी बळजबरीनं शेतकऱ्यांच्या
जमिनी घेतल्यास असंतोष अधिक वाढेल आणि सरकारविरोधात वातावरण तयार होईल, अशी शक्यता असल्यानं एमएसआरडीसीनं पर्यायी मार्गाचा विचार सुरू केला.
नवा मार्ग पुणे जिल्ह्यातील पुणे नियोजन प्राधिकरणाच्या प्रस्तावित रिंग रोडनं जाणार असल्याचीही माहिती मिळते. दरम्यान नव्या मार्गामुळे अंतर आणि खर्चात बचत होणार
असल्याचही बोललं जात आहे.